September 1, 2024 8:26 PM

ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या महिन्यात आपल्या गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला असून ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. परकीय चलनसाठा विषयक आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत ७ हजार ३२० कोटी रुपये तर ऋण बाजारपेठेत १७ हज...

September 1, 2024 7:02 PM

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी आपल्या सुलभ आणि किफायतशीर सेवांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं केंद्रीय दूरसंवादमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सातव्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये या बँकेच्...

September 1, 2024 6:59 PM

एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.   एअर मार्शल तेजिंदर सिंग १३ जून १९८७ पासून  भारतीय हवाईदलाच्या सेवेत असून त्यांचं  शिक्षण राष्ट्री...

September 1, 2024 6:56 PM

हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील – मंत्री डॉ. मनसुख मांडविय

हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार विविध मार्गांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या कामगारांना योग्य ती सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं त्...

September 1, 2024 6:46 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापनेपासून गेल्या ७५ वर्षांमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेचा पहारेकरी म्हणून अमूल्य योगदान दिलं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या द...

September 1, 2024 8:20 PM

विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या ...

September 1, 2024 8:18 PM

शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मविआचं आंदोलन

महाराष्ट्रात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदा...

September 1, 2024 7:16 PM

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आ...

September 1, 2024 3:38 PM

लष्करी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय परिवर्तन करणारा आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

लष्करी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय हा गेम चेंजर अर्थात मोठं परिवर्तन करणारा आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या निर्णयाचं वर्णन करताना म्हटलं आहे. लैंगिक समानता आणि लैंगिक न्यायातली महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवणारं हे पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण...

September 1, 2024 3:33 PM

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस

पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. उत्तम कामगिरी करून आज पदकतालिकेत भर घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रवी रंगोली, तर उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार आज मैदानात उतरतील. १० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या पात्रता फेरीत अवनी लेखराही खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे सुहास यथि...