September 1, 2024 3:29 PM

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचा दर

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.

September 1, 2024 3:25 PM

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या 'नादस्वर उत्सव' या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्...

September 1, 2024 3:21 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार आहेत. तसंच जिल्हा न्यायपालिकेच्या समारोप सत्राला देखील त्या संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्था, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक न्यायालय...

September 1, 2024 3:18 PM

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. 

September 1, 2024 3:06 PM

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे र...

September 1, 2024 3:46 PM

पोलीस पाटलांच्या थकित मानधनाचा प्रश्न मार्गी लागणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातल्या पोलीस पाटलांच्या गेल्या ४ महिन्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या शासननिर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपूर इथं बोलत होते. पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचं वय...

September 1, 2024 1:42 PM

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात

राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून देशभरात सुरू होत आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन १९८२पासून दरवर्षी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो. पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गर...

September 1, 2024 1:24 PM

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गु...

September 1, 2024 10:25 AM

लाओसमधील भारतीय दूतावासाद्वारे सायबर घोटाळा केंद्रामधून 47 नागरिकांची सुटका

लाओसमधील भारतीय दूतावासानं बोकिओ प्रांतातील गोल्डन ट्रँगल विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या सायबर घोटाळा केंद्रामध्ये अडकलेल्या 47 भारतीय नागरिकांची सुटका केली. या परिक्षेत्रामध्ये चाललेल्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई केल्यानंतर लाओस अधिकाऱ्यांनी 29 लोकांना ताब्यात घेतलं, तर उर्वरित 18 लोकांनी थे...

August 31, 2024 8:28 PM

22 जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता

रशियाच्या कामचाटका भागातल्या वाझाहेट ज्वालामुखी जवळ एक एम आय ८ जातीचे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ जण होते. आज सकाळी उड्डाण केल्यानंतर काही काळात संपर्क तुटला. हेलिकॉप्टरचा शोध सुरु आहे. यासाठी मदत आणि बचाव पथक रवाना करण्यात आलं आहे.