September 2, 2024 1:14 PM

वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ

  वस्तू आणि सेवा कर संकलनात ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक कोटी ५९ लाख रुपये संकलन झालं होतं, तर यंदा ही रक्कम एक कोटी ७५ लाख रुपये असल्याचं सरकारी आकडेवारी दाखवते.   जीएसटी अंतर्गत करदात्यांना परतावा देण्यापूर्वी केंद्र सर...

September 2, 2024 1:48 PM

भाजपा पक्षाचा देशव्यापी  संघटनात्मक  महोत्सव आजपासून सुरू

भारतीय जनता पक्षाचा देशव्यापी संघटनात्मक महोत्सव आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाअंतर्गत  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज संध्याकाळी  ५ वाजता प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांना पक्षाचे सदस्यत्व देणार आहेत.   यानंतर  देशव्यापी संघटना महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पक्षाचे...

September 2, 2024 12:46 PM

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे- ज्योतिरादित्य सिंधिया

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी आपल्या सुलभ आणि किफायतशीर सेवांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं केंद्रीय दूरसंवादमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सातव्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये या बँकेच्य...

September 2, 2024 12:40 PM

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्देन या जोडीला काल तिसऱ्या फेरीत मॅक्सिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीकडून १-६, ५-७ असा थेट सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.  ...

September 2, 2024 10:50 AM

उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केला शोक व्यक्त

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारितेच्या जगाचं न भरून येणारं नुकसान झालं असल्याचं समाजमाध्यमांवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.   उपाध्याय 64 वर्षांचे होते. दक्षिण दिल्लीतल्या वसं...

September 2, 2024 10:36 AM

दक्षिण कोरिया राबवणार सायबर सुरक्षा अभियान

दक्षिण कोरिया आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांचं, सायबर हल्ल्यापासून संरक्षण आणि अफवांचा मुकाबला करणं यासाठी आक्रमक सायबर सुरक्षा अभियान राबवणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर सुरक्षा धोरणाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद ने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण आणि विज्ञान त...

September 2, 2024 10:24 AM

पारलिंगी समुदाय उपाय योजना संबंधी मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

पारलिंगी समुदायासंबंधी असलेली धोरणं सर्वसमावेशक आणि प्रभावी असल्याची खात्री करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं संबंधितांकडून तसंच सामान्य नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर सूचना मागवल्या आहेत.   पारलिंगी समाजासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. पारलिंगी समुदायाच्या हितांच्या रक्...

September 2, 2024 7:18 PM

आंध्रप्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती

देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे.  अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं अ...

September 2, 2024 9:34 AM

आंध्र प्रदेश, तेलंगणमधील पूरस्थितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा

  प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बु...

September 2, 2024 9:38 AM

न्यायालयांमधला खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

  न्यायलयांमध्ये वर्ग खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी उपाय शोधले पाहिजेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित जिल्हा न्याय पालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. न्यायालयासमोर प्रलंबित खटल्यांची ...