September 2, 2024 4:06 PM

केंद्रीय मंत्रीमंडळाची डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज ही बैठक झाली. यासाठी २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यामुळं नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करुन दिलं जाण...

September 2, 2024 4:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल पुण्याच्या नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या झाली. दुचाकीवरुन आलेल्या १३ हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि नंतर गोळ्या झाडल्या असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना अटक केली असून पुढचा तपा...

September 2, 2024 3:58 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं आंदोलन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज धुळे शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केलं. महाविकास आघाडीचे धुळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.

September 2, 2024 3:55 PM

विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत आज वरूड इथं ते बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत विदर्भातले कापूस, सोयाबीन, संत्री उत्पादक शेतकऱ्या...

September 2, 2024 3:42 PM

शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची अनिल देशमुख यांची मागणी

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला शक्ती कायदा तातडीनं मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मागणीसाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला आघाडी आंदो...

September 2, 2024 8:27 PM

पॅरिस पॅरालम्पिकमध्ये नितेश कुमारला सुवर्ण, तर योगेश कथुनिया याला रौप्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिकचा आजचा पाचवा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला. बॅडमिंटनपटू नीतेश कुमार यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारताची पदकसंख्या नऊवर नेली. तत्पूर्वी भालाफेकपटू योगेश कथुनिया यानं रौप्यपदक पटकावलं. त्यानं ४२ मीटर २२ सेटींमी...

September 2, 2024 1:29 PM

मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार

मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांनी इम्फाळ वेस्ट जिल्ह्यातल्या कौत्रुक या गावावर काल केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. मृतांमधे एका महिलेचा समावेश असून तिची आठ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.   दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. निःशस्त्र गावकऱ्यांवर कुकी अतिरेक्यांनी केलेला हा ...

September 2, 2024 1:22 PM

इस्राएलमधे युद्धविरामाच्या मागणीसाठी विविध संघटनांची निदर्शनं

इस्रायलमधे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासशी युद्धविरामाबाबत चर्चा करावी आणि गाझामध्ये ठेवलेल्या ओलीसांची सुटका करावी, ही मागणी जोर धरत आहे.   हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलांनी जाहीर केल्यानंतर काल या मागणीसाठी देशभरात निदर्शनं सुरू झ...

September 2, 2024 1:18 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज त्यांनी कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेतलं. राष्ट्रपती मुर्मू आज वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. &nbs...

September 2, 2024 1:16 PM

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.   भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे...