September 2, 2024 8:13 PM

LIC विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट

येत्या महिनाअखेरपर्यंत LIC अर्थात जीवन वीमा महामंडळ विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट असल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे. यासंदर्भात समाज माध्यमांवर पसरवली जात असलेली माहिती बनावट असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालंय.

September 2, 2024 8:11 PM

नेटफ्लिक्सच्या ‘आयसी – ८१४ – द कंदाहार हायजॅक’ या नव्या वेबसिरीजवरून वाद

नेटफ्लिक्स या ओटीटी मंचावरच्या आयसी-८१४ - द कंदाहार हायजॅक या वेबसीरीजवरून झालेल्या वादंगाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेटफ्लिक्सच्या आशयनिर्मिती प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. आशयनिर्मिती प्रमुख स्वतः उद्या मंत्रालयासमोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या वेबस...

September 2, 2024 8:02 PM

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  &n...

September 2, 2024 7:26 PM

जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी

जेजुरीमध्ये आज सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक आले होते. दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरीमार्ग, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मं...

September 2, 2024 7:13 PM

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ६० हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आजपर्यंत राज्यात १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप...

September 2, 2024 6:54 PM

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...

September 2, 2024 7:02 PM

कार्यप्रणालीत बदल करुन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीत बदल करावे, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. कोल्हापूरच्या वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आण...

September 2, 2024 8:58 PM

कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ४,१९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर

२०२३ मधल्या खरीप हंगामादरम्यान कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकरता  राज्य शासनानं सुमारे ४ हजार १९४ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केलं आहे. हे अर्थसाह्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असून या वर्गवारीची सुरुवात १० सप्टेंबरपासून केली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय ...

September 2, 2024 7:22 PM

राज्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज राज्यभरात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाचा एक भाग म्हणून परभणीच्या  विविध भागातल्या बैलांना सजवण्यात आलं होतं. त्यांची पूजा करून तसंच नैेवद्य दाखवून त्यांची  वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.    हिंगोली जिल्ह्यातही भर पावसात बैलांना रंगरंग...

September 2, 2024 7:50 PM

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात ४ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे. मराठवाड्यात हिंगोली, जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या...