July 22, 2024 8:01 PM

मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज पौड न्यायालयानं सुनावली आहे. त्या वादग्रस्त आयएएस प्रशिक्षण अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. पुणे पोलीसांनी मनोरमा यांच्या बंगल्यातून पिस्तूल आणि पिस्तुलातल्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत. यापू...

July 22, 2024 7:53 PM

मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस ...

July 22, 2024 7:30 PM

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांचा कालावधी

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र...

July 22, 2024 8:09 PM

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर उद्या एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर  एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल.  राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चाल...

July 22, 2024 7:15 PM

२०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज

२०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक ...

July 22, 2024 8:22 PM

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली.  हे निर्देश धार्मिक भेदभाव करणारे असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, आणि इतर संस्था तसंच व्यक्तींन...

July 22, 2024 2:49 PM

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करत राबवली शोधमोहीम

मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये आज पोलिसांनी छापेमारी करत शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत विविध कलमांतर्गत ४७ जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आह...

July 22, 2024 2:45 PM

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं २०२१ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र आशीष मिश्रा याला दिल्ली किंवा लखनौ च्या बाहेर जायला मज्जाव करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने याप्रकरणी लवकर सुनावणी घ्य...

July 22, 2024 2:35 PM

पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारशी नोंदता येतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आ...

July 22, 2024 1:30 PM

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत चालू असून याप्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु आहे. असं ते म्हणाले. देशभरात ४हजार ७०० केंद्रांवर नीट युजी परीक्षा घ...