July 23, 2024 10:18 AM

तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा

तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. या अभिजात भाषांसह इतर सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यास सरकार वचनबद्ध आहे. राष्ट्रीय शैक...

July 23, 2024 10:03 AM

भारताचे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना “ऑलिंपिक ऑर्डर” हा बहुमान जाहीर

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. बिंद्र...

July 23, 2024 1:44 PM

अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

युवांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या दृष्टीने सरकारच्या पाच योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या.   अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजना :    नोकरीच्या सुरुवातीला आर्थिक सहाय्य, उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती, नोकरी देणाऱ्यांना आर्थिक सहाय्य, महि...

July 23, 2024 8:48 AM

यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल; 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवा...

July 23, 2024 8:43 AM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आ...

July 22, 2024 9:02 PM

सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृत काळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. हा अर्थसंकल्प पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणार असून सरकारच्या विकसित भारत संकल्पनेचा पाया ...

July 22, 2024 8:39 PM

धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन

नव्या भारतीय फौजदारी कायद्यांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्यापासून धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, या कायद्यांमधली नवीन कलमं आणि त्या...

July 22, 2024 8:31 PM

भारतीय क्रिकेट संघ आज भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत दाखल

भारतीय क्रिकेट संघ आज भारत-श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. या दौऱ्यात पल्लेकेले इथं २७, २८ आणि ३० जुलै रोजी  टी ट्वेंटी मालिकेतले तीन सामने होणार आहेत.  तर कोलंबो इथं २, ४, आणि ७ ऑगस्ट रोजी  एकदिवसीय मालिकेतले तीन सामने खेळले जाणार आहेत. 

July 22, 2024 8:15 PM

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ झाला. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात लाखो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नदीत स्नान केलं. त्यानंतर नदीतील पवित्र पाणी कलशातून मंदिरात आणून शिवलिंगावर अभिषे...

July 22, 2024 8:04 PM

मालवणच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावरच्या गावांतल्या विद्युत वाहिन्या भूमिगत होणार

मालवणच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावरच्या गावांतल्या विद्युत वाहिन्या आता भूमिगत होणार आहे. तसंच कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडणारी वाहिनीही भूमिगत केली जाणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत या कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या मालवण आणि कुडाळ या विभागांसाठी ६७ क...