July 22, 2024 1:07 PM

सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील बंदी केंद्र सरकारने उठवली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर १९६६ मध्ये ही बंदी लागू केली होती. ती मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं घेतला आहे.

July 22, 2024 1:41 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम क...

July 22, 2024 10:34 AM

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईसह कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातल्या अन्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्री ए...

July 22, 2024 1:45 PM

बीसीसीआयकडून ऑलिम्पिक खेळाडूंना साडे आठ कोटी रुपये अर्थसहाय्य

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला साडे आठ कोटी रुपये देण्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी केली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या आर्थिक मदतीबद्दल शाह यांचे आभार मानले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात ७० पुरुष आणि ४७ महिलांसह ...

July 22, 2024 9:40 AM

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन ...

July 22, 2024 9:45 AM

युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारताकडून १ दशलक्ष डॉलर्सचं योगदान

  जागतिक वारसा जतन करणं ही भारत आपली जबाबदारी मानत असून, युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी एक दशलक्ष डॉलर्सचं योगदान देण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या बैठकीचं काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारता...

July 22, 2024 7:37 PM

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरा...

July 21, 2024 8:25 PM

यंदाच्या नीट यूजी परीक्षेत २ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ७०० किंवा त्याहून जास्त गुण

यंदाच्या नीट यूजी परीक्षेत २३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी २ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ७०० किंवा त्याहून जास्त गुण मिळवले होते,अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशामधल्या २७६ शहरांमध्ये १ हजार ४०४ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

July 21, 2024 8:15 PM

दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार

दिल्लीमध्ये उद्यापासून कावड यात्रेला सुरवात होणार आहे. या यात्रेसाठी कावड यात्रेकरू मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये पोहोचतात, त्यांपैकी काहीजण दिल्लीच्या सीमेवरून हरयाणा आणि राजस्थानला रवाना होतात. यंदा या यात्रेसाठी सुमारे १५ ते २० लाख यात्रेकरू येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. यात्रेच्या काळात यात्रेकर...

July 21, 2024 8:09 PM

मुंबई मराठी पत्रकार संघात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण

२३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबई मराठी पत्रकार संघात झाला. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम पारितोषिक दीपावली या अंकाला, द्वितीय पारितोषिक ऋतुरंग आ...