July 26, 2024 7:10 PM

भाजपाचे रमेश कुथे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज मुंबईत शिवबंधन बांधून घेउन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

July 26, 2024 6:52 PM

जम्मू आणि काश्मिरच्या सुधारित औद्योगिक जमीन वाटप धोरणाला मंजुरी

जम्मू आणि काश्मिरच्या सुधारित औद्योगिक जमीन वाटप धोरणाला आज मंजुरी मिळाली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत २०२१ ते ३० या कालावधीसाठीच्या धोरणाला मंजुरी मिळाली. यामुळं जमीन वाटपाची प्रक्रिया सोपी होणार आहे. किमान ४ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवण...

July 26, 2024 6:44 PM

राज्य सरकारच्या गुजराती आणि सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या गुजराती आणि सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार आज जाहीर झाले. गुजराती साहित्य अकादमीचा नर्मद पुरस्कार बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला. जन्मभूमी सौराष्ट्र ट्रस्ट, अक्षय अंताणी, ललिता पटेल आणि तारिणीबहेन देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. अनुवादासाठीचा गोपाळराव विद्...

July 26, 2024 8:33 PM

मविआतल्या घटक पक्षांशी जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून १० जणांची समिती स्थापन

महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागावाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसनं १० जणांची समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, आरिफ खान, सतेज पाटील करणार आहेत. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख मुंबईतल्या ...

July 26, 2024 6:10 PM

ऑलिम्पिकच्या मैदानातले भारताचे शिलेदार

क्रीडाविश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या, पॅरिस इथं होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही आहे, हे जाणून घेण्यासाठी, की आपले शिलेदार नेमके कधी मैदानात उतरणार आहेत. या सगळ्या शिलेदारांची तोंडओळख आपण करू...

July 26, 2024 5:21 PM

गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची…

२०२४ हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते, त्या, क्रीडाविश्वात सगळ्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार आहे. भारताकडून ११७ क्रीडापटूंचा चमू या स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि हे क्रीडापटू ६९ विविध स्पर्धांमध्ये पदकाच्या शर्...

July 26, 2024 4:05 PM

रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी ही काळज...

July 26, 2024 7:40 PM

views 1

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा आज होत असून, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधल्या  सीन नदीच्या किनाऱ्यावर या  भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सीन नदीमध्ये १० हजार खेळाडूंना घेऊन १०० नौका परेड म...

July 26, 2024 3:20 PM

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी मुंबईतल्या विशेष सत्र न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व निषेध याचिका आणि दोन्ही अंतिम अहवालावर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं मान्य केली आहे. या अहवालांवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच ७ सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत.

July 26, 2024 3:17 PM

गौरी गणपती उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा शासनाचा निर्णय

गौरी गणपती उत्सवानिमित्त यंदा राज्यातल्या सुमारे १ कोटी ७० लाख शिधापत्रिका धारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.   प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे....