July 26, 2024 8:23 PM

राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

राज्यसभेचं कामकाज आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ वरच्या चर्चेनं सुरु झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केवळ अल्पकालीन लोनानुनयी निर्णय घेतले नसून मध्यम आणि दीर्घकालीन विचारांवर काम केल्याचं वायएसआरसीपीचे एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. तर, हा अर्थसंकल्प लोकविरोधी आणि संघराज्य वि...

July 26, 2024 8:18 PM

लोकसभेत मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत दिली माहिती

कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लिहीत उत्तरामध्ये माहिती दिली की, २०१८ पासून, या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत देशाच्या उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या ६६१ न्यायाधीशांपैकी  २१ न्यायाधीश अनुसूचित जमाती प्रवर्गातले, ७८ इतर मागास वर्ग, आणि ४९९ न्यायाधीश खुल्या प्रवर्गात...

July 26, 2024 8:12 PM

लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेचं कामकाज आज २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरु झालं. चर्चेत भाग घेताना भाजपाचे जुगल किशोर म्हणाले की, हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून, तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात स...

July 26, 2024 8:04 PM

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात आणि प्रादेशिक सशस्त्र प्रोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य देण्यात येईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अग्निविरांच्या रूपानं देशाला प्रशिक्षित आणि शिस्तशीर सैनिक मिळाल्यानं फायदा होईल असंही ते म्हणाले. गेल्या १० वर्षात संरक्षण...

July 26, 2024 7:52 PM

भारतानं आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं

ADPC अर्थात आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद भारतानं काल स्वीकारलं. थायलंडमध्ये बँकॉक इथं भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आस्थापनेचे राजेंद्र सिंग यांनी चीनकडून या वर्षासाठीचं अध्यक्षपद स्वीकारलं. ADPC ही आशिया आणि पॅसिफिक प्रदेशांमधल्या देशांनी हवामानाशी संबधित संकटांना तोंंड देण्...

July 26, 2024 8:30 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ९ व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील.  ‘विकसित भारत @ २०४७’, ही यंदाच्या बैठकीची संकल्पना आहे.    केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सहभागात्मक प्रशासन आणि सहयोगाला चालना देण्या...

July 26, 2024 7:38 PM

पुण्यात स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महा...

July 26, 2024 8:38 PM

कारगिल युद्धातला विजय सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.   २५ व्या कारगिल विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाख मधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वो...

July 26, 2024 7:18 PM

गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्मिती – राज्यमंत्री शोभा करंदलाजे

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली. गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज संसदेत दिली. या ६ वर्षांच्या कालावधीत देशात एकूण रोजगारामध्ये ३५ टक्के वाढ झाली असल...

July 26, 2024 7:14 PM

शेअर बाजारात आज तेजीचा जोर

सलग पाच सत्रांमधल्या घसरणी नंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल १ हजार २९३ अंकांची उसळी घेतली आणि तो ८१ हजार ३३३ अंकांवर बंद झाला.   बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टिनं आज २४ हजार ८६१ अंकांचा नवा उच्चांक नोंद...