July 26, 2024 3:11 PM

नांदगाव पेठ इथे झालेल्या ट्रक आणि कार अपघातात २ जण ठार

अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ इथे काल ट्रक आणि कारची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमी व्यक्ती अकोल्यातल्या मोठी उमरी भागातले रहिवासी आहेत.

July 26, 2024 2:27 PM

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळच्या भागांना दिली भेट

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळच्या भागांना भेट दिली आणि सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला. कुपवाडा इथं झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत प्राणांची आहुती देणाऱ्या नाईक दिलावर खान यांना जनरल द्विवेदी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी जनरल द्विवेदी यांच्यासह जम्मू...

July 26, 2024 2:22 PM

जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये भारतातली पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार

देशाची कृषी निर्यात आणि आयात क्षमतेला चालना देण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये भारतातली पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सार्वजनिक-खासगी तत्त्वावर हे आयात-निर्यात आणि स्थानिक कृषी मालावर आधारित प्रक्रिया आणि स...

July 26, 2024 1:35 PM

संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला.   कर्नाटकचे मुख्यमं...

July 26, 2024 1:23 PM

श्रीलंकेच्या ३६ विद्यार्थ्यांची भारतात हिंदी शिकण्यासाठी निवड

श्रीलंकेच्या ३६ विद्यार्थ्यांची भारतात हिंदी शिकण्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क आणि इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम नऊ महिन्यांचा असून येत्या ऑगस्टपासून आग्र्यातल्या केंद्रीय हिंदी संस्थेत सुरू होणार आहे. श्रीलंकेतील भार...

July 26, 2024 1:18 PM

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार

श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं १५ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज मागवले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे ५ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर...

July 26, 2024 1:15 PM

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं अमेरिकेचं इस्राइलला आवाहन

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं आवाहन अमेरिकेनं इस्राइलला केलं आहे. इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्यू यांनी आज वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यावेळी हॅरिस यांनी ही विनंती नेत्यानू यांना केली. शस्त्रसंधीमधल...

July 26, 2024 1:01 PM

महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्यात येणार

राज्यात छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यात तातडीनं कांदा बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. काल कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते.    कांदा हे नाशवंत पीक असून त्याची नासाडी रोखण...

July 26, 2024 11:24 AM

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव

केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असून, काल मांजेरी आणि कोझिकोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची एकंदर संख्या आठ झाली आहे.   गेल्या रविवारी निपाह विषाणूमुळे बळी गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाच्या संपर्कात...

July 26, 2024 11:18 AM

ईशान्येकडील राज्यांतल्या आदिवासींच्या समस्यांचं समाधान आणि निराकरण करण्यात येईल – अमित शाह

  ईशान्येकडील राज्यांतील अनेक आदिवासी नेत्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि तिथल्या आदिवासींना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर चर्चा केली. राज्यघटनेच्या 6 व्या अनुसूची अंतर्गत स्थापन झालेल्या 10 आदिवासी स्वायत्त जिल्हा परिषदांना, अधिक घटनात्मक अधिकार प्रदान करणारं 125 व...