July 28, 2024 7:25 PM

कांस्यपदक जिंकत मनू भाकरनं केला भारताच्या पदक कमाईचा प्रारंभ

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज मनू भाकर हिनं आज इतिहास घडवला. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं २२१ पूर्णांक ७ दशांश गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेतलं पहिलंवहिलं पदक भारताला मिळवून दिलं. १२ वर्षांनी भारताला नेमबाजीत पदक मिळालं आहे.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष...

July 28, 2024 7:21 PM

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता. हर घर ...

July 28, 2024 7:20 PM

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ४० मार्गांवरची वाहतूक ठप्प

    गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे गडचिरोली-चार्मोशी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या चाळीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. धानोरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पावसांची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत...

July 28, 2024 7:19 PM

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पराभूत

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. स्मृती मंधानानं सर्वाधिक ६० धावा केल्या. रिचा घोषनं १४ चेंडूत ३०, तर जेनिमा रॉड्रि...

July 28, 2024 6:13 PM

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.    येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली...

July 28, 2024 3:40 PM

भंडारा जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले आहेत. लाखनी तालुक्यात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.   नांदेड इथल्या विष्...

July 28, 2024 3:36 PM

नवी मुंबई आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा कोपरखैरणे ते वाशी लॉंग मार्च

नवी मुंबईतल्या शिळफाटा इथल्या मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी आज नागरिकांनी नवी मुंबईत मोर्चा काढला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.   दरम्यान, यातल्या दोषींवर आरोपपत्र दाखल कर...

July 28, 2024 3:46 PM

नवी मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक

नवी मुंबईच्या वाशी सेक्टर ९ मधल्या हिट अँड रन प्रकरणात दोन आरोपींना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी एका कारनं दिलेल्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली.

July 28, 2024 2:29 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात मनू भाकरची आज लढत

पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत गाजवला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत मनू भाकर हिनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी आज रंगणार आहे.   पुरुष हॉकी संघानं ब गटाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात करून विजयी सलामी दिली. भ...

July 28, 2024 2:25 PM

व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान

व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासमोर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आव्हान उभं केलं असून एडमंडो गोन्झालेझ उरुतिया हे मादुरो यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. युनायटेड सोशालिस्ट पक्षाचे नेते निकोलस मादुरो हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची...