July 29, 2024 9:53 AM

पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा

पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा झाली आहे; त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. पुण्यातल्या झिका रूग्णांची संख्या आता 45 झाली आहे. झिकाबाधित रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपासण्याही आरोग्य विभाग करत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिलं ...

July 29, 2024 9:48 AM

कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद

छत्तीसगडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात हॉकी मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र हॉकी संघाचा 4-6 असा पराभव झाला; तर महिला गटात मध्यप्रदेश संघानेच पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्रावर 4-2 अशी मात केली.

July 28, 2024 8:48 PM

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन उद्या नवी दिल्लीत साजरा करणार

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन उद्या नवी दिल्लीतल्या माणेकशॉ सेंटर सभागृहात  अखिल भारतीय शिक्षा समागम ABSS, २०२४ या संकल्पनेत  साजरा करणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध भागधारकांच्या वचनबद्धतेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अखिल भार...

July 28, 2024 8:52 PM

CUET-UG सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

CUET-UG सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. उमेदवारांचे निकाल संबंधित विद्यापीठांना देण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांशी संपर्कात रहावं, असा सल्ला राष्ट्रीय चाचणी संस्थेनं दिला आहे. १५ ते २९ म...

July 28, 2024 8:19 PM

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर केला. भेदभाव विरोधी चळवळीच्या रिफत रशीद, अब्दुल हनान मसुद आणि माहीन सारकर या समन्वयकांना त्यांच्या साथीदारांसाहित पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   आरक्षण सुधारणांसाठी आयोगाची नि...

July 28, 2024 7:59 PM

दिल्लीत खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं ३ जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

दिल्लीमधल्या एका खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं तीन जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. हे चौघेही विद्यार्थी असून, तीघे जण नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.   येत्या मंग...

July 28, 2024 7:45 PM

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा देशाच्या १४० कोटी जनतेला मिळणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला. या अर्थसंकल्पात फक्त गरिबांचं ...

July 28, 2024 7:40 PM

प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा संदर्भात जागृती करावी – मंत्री नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातल्या अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासन, वाहतूक तसंच रस्ते बांधणी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखणं आणि लोकसहभाग वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी हे आज नागपूर जिल्हा सुरक्षा समिती बैठकीत सहभागी झ...

July 28, 2024 8:38 PM

कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ रोमला रवाना

इस्रायल-हमास संघर्ष संपवण्याच्या दृष्टीनं कतार, इजिप्त आणि अमेरिकी मध्यस्थांशी चर्चा करण्यासाठी इस्रायलचं शिष्टमंडळ आज रोमला रवाना झालं. मोसादचे संचालक डेव्हिड बरनिया यांच्या नेतृत्वाखाली हे  शिष्टमंडळ कतार, इजिप्त आणि अमेरिका मध्यस्थांशी चर्चा करेल. गाझा पट्टीमध्ये युद्धविराम, आणि १०० हून जास्त ओलि...

July 28, 2024 7:31 PM

विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचं उपलजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

कोल्हापुरात विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानं उपलजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याविषयीचं निवेदन त्यांना सादर केलं. विशाळगडावरच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्‍न समोपचारानं सुटणं शक्य असतानाही, षडयंत्र करून मुस्लिम वस्तीला लक्ष्य केलं गेलं, इथल्या मशि‍दीव...