July 29, 2024 3:34 PM

प्रधानमंत्री उद्या ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल-केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल - केंद्रीय अर्थसंकल्पोत्तर परिषदे’ला संबोधित करणार आहेत. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. सरकारच्या दूरदर्शी योजना आणि या प्रवासात उद्योगांची भूमिका याचा आराखडा सादर करण्याचा या परिषदेचा उद्देश...

July 29, 2024 1:47 PM

शेयर बाजारात आज सकाळच्या सत्रात नव्या उच्चांकाला स्पर्श

भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रात विक्रमी तेजीवर उघडला.  सुरुवातीलाच सेन्सेक्सनं ८१ हजार ७४९ चा तर  निफ्टीनं २४ हजार ९८० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. छोट्या तसंच मध्यम शेअर्समध्येही तेजीचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारानं शुक्रवारी बंद होताना सकारात्मक तेजी गाठली होती. सर्व आशियाई शेअर ब...

July 29, 2024 4:10 PM

टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

जपानच्या टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. जागतिक पातळीवर आर्थिक वाढ करणं हे एक मोठं आव्हान असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या प...

July 29, 2024 4:58 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोज...

July 29, 2024 1:47 PM

५४व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पाच विद्यार्थ्यांची २ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची कमाई

इराणमध्ये नुकत्याच झालेल्या ५४व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या सर्व पाच विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांची कमाई केली आहे. रिदम केडिया आणि वेद लाहोटी यांनी सुवर्ण, तर आकर्ष राज सहाय, भव्या तिवारी आणि जयवारी सिंह यांनी रौप्यपदकावर नाव कोरलं. प्राध्...

July 29, 2024 1:28 PM

दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांना टाळं

दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांच्या तळघरांना दिल्ली महानगर पालिकेनं टाळं ठोकलं आहे. तळघरात सुरू असलेली तीन केंद्र बंद करण्यात आली असून राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.  या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सात झाली...

July 29, 2024 7:05 PM

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

दिल्लीतल्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यसभेत आज अल्पकालीन चर्चा झाली. भाजपाचे डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी चर्चेला सुरुवात केली. अक्षम्य निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्...

July 29, 2024 4:46 PM

जगभरात आज ‘व्याघ्र दिन’ साजरा

जगभरात आज व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणं, तसंच  त्याबद्दल जनजागृती करणं आणि वाघांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्यांवर विचार करणं या  उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. जगातल्या एकूण  वाघांपैकी ८० टक्के वाघ भारतात आढळतात. जागतिक व...

July 29, 2024 11:51 AM

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन आज नवी दिल्लीतल्या माणेकशॉ सेंटर सभागृहात अखिल भारतीय शिक्षा समागम ABSS, २०२४ या संकल्पनेत  साजरा करणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध भागधारकांच्या वचनबद्धतेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अखिल भारतीय ...

July 29, 2024 11:12 AM

केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री आज जपानमधील टोकियो इथे होत असलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार

केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज जपानमधील टोकियो इथे होत असलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर जयशंकर यांचं दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी काल टोकियो इथे आगमन झालं.  या बैठकीत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय राजनैति...