July 28, 2024 2:22 PM

‘निवडून आल्यास अमेरिकेला जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू’

आपण निवडून आलो तर अमेरिकेला या जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू, असं आश्वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. नॅशव्हिल इथं आयोजित बिटकॉइन २०२४ या परिषदेत ते बोलत होते. आपलं प्रशासन क्रिप्टो चलनासाठी धोरण तयार कर...

July 28, 2024 1:30 PM

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्रातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे, महेश राऊत आणि सुरेंद्र गडलिंग यांनी जामिनीसाठी याचिका दाखल केली होती. या सर्वांना २०१८ साली अटक करण्यात आली होती.

July 28, 2024 1:28 PM

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सध्याचे झारखंडचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी भाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तेलंगणात, त्...

July 28, 2024 2:44 PM

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. भाजपाच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, शिवसेनेच्या भावना गवळ...

July 28, 2024 12:51 PM

‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन करतो आहे. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही स...

July 28, 2024 2:45 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोक्यो इथं पोहोचले. जपानमधले भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जयशंकर यांनी एदोगावा इथल्या फ्रीडम प्लाझा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. गांधीजींचा शांततेचा संदेश आजही तितकाच क...

July 27, 2024 8:12 PM

युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सात नवीन स्थळांचा समावेश

युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आज सात नवीन स्थळांचा समावेश केला आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भरलेल्या ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात हा समावेश करण्यात आला. यामध्ये जपानचं सदो बेट सोन्याच्या खाणी, चीनचं बीजिंग सेंट्रल ॲक्सिस, थायलंडचे फु फ्राबट ऐतिहासिक पार्क, रशियाचं केनोझेरो...

July 27, 2024 8:08 PM

ॲक्ट ईस्ट धोरणाद्वारे भारत आशियाई एकता आणि केंद्रस्थान कायम राखेल – परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

ॲक्ट ईस्ट धोरणाद्वारे भारत आशियाई एकता आणि केंद्रस्थान कायम राखेल, असं  परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. आज चौदाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत  बोलत होते.  सीमा सुरक्षा सुनिश्चित करणं, देशांतर्गत गुन्हेगारी रोखणं, हिंसाचार कमी करणे आणि कनेक्टिव्हि...

July 27, 2024 8:05 PM

गाझामध्ये इस्राएलच्या हल्ल्यात शाळेत आश्रय घेतलेले ३० पॅलेस्टिनी ठार, १०० हून अधिक जण जखमी

गाझाच्या मध्यवर्ती भागात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात आज एका शाळेत आश्रय घेतलेले किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मात्र, आपण शाळेच्या आवारात असलेल्या हमासच्या तळावर हल्ला केल्याचं इस्राएलच्या लष्करानं सांगितलं आहे. या शाळेच्या आश्रयानं शस्त्रास्त्रांचा साठा केला जात अ...

July 27, 2024 8:01 PM

विशेष लोक अदालत सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं आवाहन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विशेष लोक अदालत सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन केलं आहे. हा सप्ताह २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात मालमत्ताविषयक वाद, नोकरी, कामगारांच्या समस्या, जमीन अधिग्रहण मोबदला, अपघात प्रकरणातील दावे सर्वोच्च न्यायालयाच्य...