August 1, 2024 4:51 PM

अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन

अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं.   अन्यायाची जाणीव करून देणं आणि त्याविरोधात लढण्याची प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं केलं. त्यांच्या साहित्यान...

August 1, 2024 7:26 PM

पॅरिस ऑलिंपिकमधे स्वप्नील कुसळेनं नेमबाजीत पटकावलं कांस्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या स्वप्निल कुसळेनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात आज कास्यपदकाला गवसणी घातली. त्यानं ४५१ पूर्णांक ४ दशांश गुणांची कमाई केली. चीनच्या युकुन लिऊ यानं सुवर्ण, तर युक्रेनच्या सेरही कुलिश यांनी रौप्यपदक पटकावलं...

August 1, 2024 7:55 PM

महामार्ग दुरुस्त केला नाही तर ‘ निलंबन ‘ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक येत्या १० दिवसांत सुरळित झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. ते आज मंत्रालयात या महामार्गाच्या सुधारणेबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.   मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणा...

August 1, 2024 8:24 PM

केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरू सुरक्षित स्थळी पोहचले

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरूंना रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या लींचोली आणि भिम्बली इथून हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. विविध ठिकाणांहून सुमारे चौदाशे यात्रेकरू बचाव पथकाच्या मदतीनं पायी चालत सोनप्रयागला पोहचले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर स...

August 1, 2024 8:36 PM

वायनाड दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी योग्य पावलं उचलली जातील – मुख्यमंत्री पिनरायी विजयन

केरळमधे वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी पावलं उचलली जातील असं, मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सांगितलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैैठक घ...

August 1, 2024 3:40 PM

कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळ...

August 1, 2024 5:25 PM

टीसीने मिळवले ऑलिम्पिक पदक…

रेल्वेत टीसी म्हणून काम आणि क्रीडाक्षेत्रातली अविस्मरणीय कामगिरी, हे वर्णन ऐकून कुणाची आठवण येते? मला माहितीये, तुमच्या मनात भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं नाव आलं असेल, बरोबर ना? आता, धोनीसोबतच आणखी एका भारतीय क्रीडापटूचं नाव या वर्णनाशी तंतोतंत जुळेल. स्वप्नील कुसळे. तो मध्य रेल्वेच्या पुणे...

August 1, 2024 3:15 PM

रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

देशात झालेल्या रेल्वे अपघातांच्या घटनांबद्दल आत्मपरीक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. सभागृहात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणी संदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दरवर्...

August 1, 2024 2:52 PM

शोमिता बिस्वास यांनी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला

भारतीय वनसेवा अधिकारी शोमिता बिस्वास यांनी काल नागपूर इथं महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक बनल्या आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिस्वास यांचं स्वागत केलं. राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आण...

August 1, 2024 2:47 PM

मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं आवाहन

हमास संघटनेचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया याची इराणमध्ये हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी  राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलं आहे. चीन, रशिया, अल्जेरिया या देशांनी हनिया याच्या हत्येचा निषेध केला असून हे दहशतवादी कृत्य...