August 1, 2024 2:44 PM

अमरनाथ यात्रेसाठी १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या  भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून १  हजार २९५ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी ४८ वाहनांच्या ताफ्यासह, आज पहाटे काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. यापैकी ३४९ यात्रेकरू बालताल बेस कॅम्प कडे, तर ९४६ यात्रेकरू पहेलगाम बेसकॅम्प कडे रवाना झाले.  तिथून पुढे ते अमरनाथ गुंफेकडे मार्ग...

August 1, 2024 2:38 PM

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताच्या स्वातंत्र्य प्रेरणेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज  राज...

August 1, 2024 1:37 PM

देशभरातल्या १५ विमानतळांवर डिजियात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार

देशभरातल्या १५ विमानतळांवर डिजियात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन यांनी दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. डिजियात्रा उपक्रमामुळे प्रवाशांचा विमानतळावरचा वावर सुलभ होतो, असं त्यांनी सांगितलं. हा उपक्रम लवकरच...

August 1, 2024 1:21 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांच्यात द्विपक्षीय बैठक

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांचं आज सकाळी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. फाम मिन्ह चिन्ह भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांबर...

August 1, 2024 10:09 AM

६ ऑगस्टपासून पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती २०२४’ चं आयोजन

भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव 'तरंग शक्ती २०२४' दोन टप्प्यात पुढील महिन्याच्या 6 तारखेपासून तामिळनाडूतील सुलार इथं आयोजित करणार आहे. या सरावात अंदाजे 30 देश सहभागी होणार असून यातील दहा देश त्यांच्या लढाऊ विमानांसह सरावात सहभागी होणार आहेत. या सरावात भारताच्या संरक्षण पराक्रमाचं प्रदर्शन घडव...

August 1, 2024 10:03 AM

इंडिया @100 या पुस्तकांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

प्राध्यापक के. व्ही. सुब्रमण्यम लिखित इंडिया @ 100 एनव्हिजनिंग टुमारोज एकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना गोयल म्हणाले, 140 कोटी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानी विकसित भारताचं ध्येय स...

August 1, 2024 7:34 PM

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षाचे होते. गायकवाड १९७५ ते १९८७ या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ४० कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले.. २०१७-१८ यावर्षीच्या सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते निवड समितीचे सदस्य होते त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघा...

August 1, 2024 9:50 AM

भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

  भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं की, देशाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे. मंत्रालयानं सांगितलं की, भारत प्रशांत आर्थिक रचनेतील भारत आणि इतर 13 भागीदारांनी मिळून पुरवठा साखळीतील लवचिकता टिकून राहण्याच्या दृष्टीने समृद्धी ...

August 1, 2024 9:30 AM

रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन

रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध ...

August 1, 2024 9:14 AM

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून “एक तास शहरासाठी” महास्वच्छता अभियान

  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून “एक तास शहरासाठी” हे शहरव्यापी महास्वच्छता अभियान आजपासून येत्या पंधरा तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता क्रांती चौकापासून या अभियानाची सुरुवात होईल. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अनोखं अभियान राबवण्...