August 1, 2024 8:32 PM

दक्षिण गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात हमास सेनेचा प्रमुख मोहम्मद डेईफ मारला गेल्याची इस्रायली सैन्याकडून पुष्टी

गेल्या महिन्यात गाझाच्या दक्षिण भागात केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद डेईफ मारला गेल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे. १३ जूनला गाझाच्या खान युनिस केलेल्या हल्ल्याचं लक्ष्य डेईफच होता. तो हमासची लष्करी शाखा असलेल्या कासम ब्रिगेडच्या प्रमुखांपैकी एक होता. त्यानं २० वर्षांहून...

August 1, 2024 8:13 PM

शिक्षण क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा आणि दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली – तेजस्वी सूर्या

लोकसभेत आज शिक्षण मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली. गेल्या १० वर्षात देशाच्या शिक्षण क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा आणि दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचं भाजपाचे तेजस्वी सूर्या यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी शाळा आणि महाविद्यालयांमधल्या रिक...

August 1, 2024 8:06 PM

देशातल्या उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३५९ पदं रिक्त – मंत्री अर्जुन राम मेघवाल

देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३५९ पदं रिक्त असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशभरातल्या जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांमधेही न्यायाधीशांची ५ हजार २३८ पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं ...

August 1, 2024 7:37 PM

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला

नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने आज फेटाळला.   केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय काल दिला. तसंच भविष्यात कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर त्यांच्याव...

August 1, 2024 7:43 PM

नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव…

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदकाला गवसणी घालणारा नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतानं नेमबाजीत तीन पदकं मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नीलच्या समर्पण आणि चिकाटीमुळे ज...

August 1, 2024 7:16 PM

हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगीरांना राज्य सरकारचं अनुदान मिळालेलं नाही – खासदार रजनी पाटील

हिंदकेसरी ठरलेल्या कुस्तीगीरांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या ११ वर्षांपासून मिळालेलं नाही, हा मुद्दा राज्यसभेत खासदार रजनी पाटील यांनी उपस्थित केला. खेळाडूंचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं, यादृष्टीनं विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी रजनी पाटील यांनी केली.   देशात निवडणूक लढवण्यासा...

August 1, 2024 8:37 PM

अनुसूचित जाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी करणं आणि वेगवेगळा कोटा देणं चुकीचं नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

आरक्षणाचा फायदा अधिक मागासांना मिळावा या दृष्टीनं राज्य सरकारांनी अनुसूचित जाती प्रवर्गात आणखी उपवर्गवारी करायला, आणि त्यांना स्वतंत्र कोटा द्यायला हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली संविधान पीठानं आज ६ विरुद्ध १ असा हा ...

August 1, 2024 8:38 PM

आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक २०२४ आज लोकसभेत सादर केलं. या विधेयकाअन्वये २००५च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात बदल करून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची कार्यपद्धती बळकट करण्यात येईल. जल जीवन मिशनअंतर्गत देशभरात १५ कोटीपेक्षा जास्त ...

August 1, 2024 8:20 PM

हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ५५ जण बेपत्ता

हिमाचल प्रदेशात काल रात्री तीन ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आलेल्या पुरात ५५ जण बेपत्ता झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीमुळे शिमला जिल्ह्यात ३६ जण तर मंडी जिल्ह्यात ९ जण बेपत्ता झाले असून २ मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती ...

August 1, 2024 5:02 PM

जल जीवन मिशनअंतर्गत सरकारनं देशात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या – मंत्री सी. आर. पाटील

जल जीवन मिशन अंतर्गत, सरकारनं देशभरात १५ कोटीहून अधिक नळ जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती जल शक्ती मंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. नळाद्वारे पाणी मिळवण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात असून यामुळे विजेच्या बिलात बचत होईल असंही ते म्हणाले. पिण्याच्...