August 2, 2024 2:14 PM

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे – डॉ. एल. मुरुगन

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. या संदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार...

August 2, 2024 3:29 PM

पॅरिसमध्ये बॅडमिंटन नेमबाजी हॉकीसह विविध स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष

पॅरिस ऑलिंपिक्सच्या आजच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडू बँडमिंटन, २५ मिटर पिस्तुल. हॉकी, ज्यूडो तसचं जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे. पुरुषांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना चीन तैपैईच्या चाऊ तियेन चेन बरोबर होणार आहे. दोन कांस्य पदक पटकावणारी मनु भाकर आज २५ मिटर पिस्तुल नेमबाज...

August 2, 2024 3:41 PM

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं केलं १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल बिहारमध्ये १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पेपरफुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मनिष प्रकाश, सिकंदर यादवेंदु आणि इतर ११ जणांनर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीट युजी पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे...

August 2, 2024 3:42 PM

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. फोरमच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्य...

August 2, 2024 11:17 AM

बिहारमध्ये वीज पडल्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये, वीज पडल्यामुळे किमान १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू गया येथे झाले असून, जेहानाबादमध्ये तीन आणि रोहतास जिल्ह्यात दोन मृत्यू झाले आहेत. चालू खरीप हंगामात शेतात काम करणाऱ्या लोकांवर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्र...

August 2, 2024 11:14 AM

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलंबोमध्ये होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या २० षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भा...

August 2, 2024 10:23 AM

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल झाल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, राज्यात जुलै अखेर सुमारे ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ कोटी १० लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे.

August 2, 2024 2:26 PM

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपय...

August 2, 2024 1:56 PM

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातले रस्ते, पूल, विजेच्या तारा आणि पाणीपुरवठा वाहिन्यांचं तसंच शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्र...

August 2, 2024 1:52 PM

जुलै महिन्यात देशभरात युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांनी गाठला २० लाख ६४ हजार कोटी रुपयांचा टप्पा

यंदाच्या जुलै महिन्यात देशभरात युपीआय आधारित व्यवहारांमध्ये वाढ होऊन ते २० लाख ६४ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काल जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. युपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये दर वर्षी ३५ टक्के वाढ होत असल्याचं यात म्हटलं आहे. जुलैमध्ये एकू...