August 29, 2024 3:54 PM

दिल्लीत सकाळी भूकंपाचे धक्के

दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ५ पूर्णांक ७ दशांश इतकी नोंदली गेली. भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

August 29, 2024 3:28 PM

राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची जयंत पाटील यांची टीका

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या केल्याच्या घटनेवरून राज्यात कणा नसलेले सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यातल्या महिला, मुली, सामान्य नागरिक सुरक्षित नव्हते...

August 29, 2024 3:24 PM

नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिकमधल्या सर्व मतदान यंत्रांची देखभाल दुरुस्ती तपासणी चाचणी पूर्ण झाली आहे. अकरा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे तसंच तज्ञ अभियंते उपस्थित होेते. ही यंत्रं सुस्थि...

August 29, 2024 7:12 PM

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्र...

August 29, 2024 7:19 PM

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीचं उद्घाटन

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस पासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस गाडी आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गणेशोत्सवासा...

August 29, 2024 1:51 PM

देशात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उ...

August 29, 2024 1:47 PM

विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात छापे

आंध्रप्रदेशात विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तरप्रदेश, बिहार, आणि हरयाणामधे मिळून १६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.   या कारवाईत २२ मोबाईल फोन्स, आणि  अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं...

August 29, 2024 1:44 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सीडीएस आणि एनडीए परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या १ सप्टेंबरला सीडीएस म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली असून ही परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि ३ ते ५ या वेळेत घेण्यात येईल. तर एनडीए परीक्षा सकाळी १० ते साडेबारा आणि दुपारी २ ते साडेचार या वेळेत घेण्यात येईल.

August 29, 2024 1:37 PM

युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी

केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्रसरकारने दिली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससी...

August 29, 2024 1:30 PM

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आर्थर ॲशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं त्याच्याच देशाचा म्हणजेच सर्बियाच्या लास्लो जेरेचाचा ६-४, ६-४, २-० ने पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरनशी होणार असून जोकोविचनं गेल...