August 29, 2024 7:48 PM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहचले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी  कोलंबो इथं पोहोचले आहेत. भारत श्रीलंका आम मालदीव्ज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या तयारीचा ते आढावा घेतील.    दहशतवादाचा सामना करण्यासाठी, पोलीस, कायदा अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा या ...

August 29, 2024 7:24 PM

मनोज जरांगे यांचा २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार आज आंतरवाली सराटी इथं जाहीर केला. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट याच दिवशी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.   या आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आज आंदोलक समन्वय...

August 29, 2024 7:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचं आज ‘आत्मक्लेश’ मूक आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत 'आत्मक्लेश' मूक आंदोलन करण्यात आलं. चेंबूर इथं छत्रपती शिवाजी महाराज...

August 29, 2024 8:19 PM

‘महाराष्ट्र’ जीडीपीत सर्वाधिक वाटा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. आपलं सरकार रात्रंदिवस काम करत असून घरात बसून सरकार चालवता नाही येत, त्यासाठी जनतेशी संपर्कात राहि...

August 29, 2024 6:49 PM

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी सार्वकालिक उंचीवर

भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीने या सत्रातला सार्वकालिक उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ३४९ अंकाची वाढ झाली आणि तो ८२ हजार १३५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आज १०० अंकांची वाढ झाली आणि तो २५ हजार १५२ अंकांवर बंद झाला.

August 29, 2024 7:06 PM

वाढवण बंदर देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल – मंत्री सर्बानंद सोनोवाल

वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पालघर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोल...

August 29, 2024 3:57 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी झालेल्या संघर्षात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काल आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या...

August 29, 2024 3:49 PM

भारत स्टार्टअप उद्योगांची मांदियाळी – मंत्री जितीन प्रसाद

भारत स्टार्टअप उद्योगांची मांदियाळी असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री जितिन प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत डिजिटल भारत इकॉनॉमी कॉन्क्लेव्हला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की गेल्या १० वर्षात दर ४० मिनिटांनी एक या वेगानं स्टार्टअप उद्योग देशात सुरु झाले आहेत. ए...

August 29, 2024 8:18 PM

रोखे करार नियमन कायद्यात अर्थ मंत्रालयाकडून सुधारणा

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं एससीआरआर, अर्थात रोखे करार नियमन कायदा १९५६ मध्ये सुधारणा केली आहे. आयएफएससी अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या अखत्यारितल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये जागतिक मानकांनुसार सूचीबद्ध होण्याची इच्छा असलेल्या भारतीय कंपन्यांकरता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सुध...

August 29, 2024 3:42 PM

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘नव्या भारताचे नवीन कायदे’ विषयावर चित्र प्रदर्शनाचं आयोजन

सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस यांच्यातर्फे नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी भाषेत कायद्यांविषयी माहिती दिली असून तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या असल्याचं या कार्यक्र...