July 15, 2024 7:44 PM

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे स्...

July 15, 2024 4:00 PM

महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात केली.ते काल पंढरपूरात आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी मंत्री मंडळातले इतर सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते.   पंढरपू...

July 15, 2024 3:35 PM

DD-Robocon India 2024 स्पर्धेत निरमा विद्यापीठ विजयी

प्रसारभारती आणि भारतीय तंत्रशिक्षण संस्था दिल्ली यांच्या वतीनं आयेजित DD-Robocon India 2024 ही स्पर्धा निरमा विद्यापीठानं जिंकली आहे. या स्पर्धेत पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रथम उपविजेते, तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठानं दुसऱ्या उप-विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.   दोन दिवस न...

July 15, 2024 3:23 PM

भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंट 2030 पर्यंत दुप्पट होऊन 7 लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता

भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंटचं प्रमाण येत्या २०३० सालापर्यंत दुप्पट होऊन सात लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.केर्नी आणि अमेझॉन पे या संस्थांनी शहरी भारत कसं पेमेंट करतो, यासंदर्भात केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानंतर हा अंदाज व्यक्त केला आहे.   आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये किरकोळ व्यवहारा...

July 15, 2024 3:56 PM

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवली बाजारात परकीय संस्थांकडून २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय संस्थांनी भारतीय भांडवली बाजारात २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.गुंतवणूकदारांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी १५ हजार ३५२ कोटी रुपये समभाग विक्री आणि ८ हजार ४८४ कोटी रुपये कर्जाऊ बाजारात गुंतवले,ज्यामुळे १२ जुलैपर्यंत भ...

July 15, 2024 7:07 PM

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश – जयंत पाटील

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रैालेट ॲक्टच्या धर्तीवर आधा...

July 15, 2024 3:15 PM

CUET UG परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार

CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे.इच्छुक विद्यार्थ्यांना इ मेल द्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत.लवकरच विद्यार्थ्यांना परीक्ष...

July 15, 2024 2:57 PM

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्काराझ विजयी

स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि सात वेळा विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव केला.   पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या...

July 15, 2024 2:46 PM

गुजरातमध्ये अहमदाबाद-बडोदा द्रुतगती मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज सकाळी आनंद जवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चिकोरी गावाजवळ एका बसचा टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि इतर पाचजण जागीच ठा...

July 15, 2024 2:53 PM

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.   मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजा...