July 15, 2024 7:58 PM

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. चंद्रपूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यांच्या महसूल कार्यालयात आज आंदोलनामुळे कामकाज ठप्प झालं. चंद्रपूर इथं आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर बीडमध्ये कर्मचाऱ्यां...

July 15, 2024 7:49 PM

राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार

राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे शेतात पेरण्यांना वेग आला असून अनेक ठिकाणी पेरणीची कामं उरकत  आली आहेत.  नाशिक जिल्ह्यात ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त खरीपाचं क्षेत्र असून यापैकी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला ...

July 15, 2024 7:42 PM

मुंबई शेअर बाजारात चढउतार

शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत १६७ अंकांनी वर उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्यादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा ८० हजार ८६३ अंकांची नवी उंची गाठली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४ हजार ६३५ उंचीवर पोचला होता. ...

July 15, 2024 7:38 PM

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलैपर्यंत तीव्र आंदोलनं

दुधाला प्रतिलीटर ४० रुपये भाव तसंच रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभरात आजपासून २१ जुलैपर्यंत तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांनी ही माहिती दिली.  या आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर जिल्...

July 15, 2024 7:34 PM

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नाशिकमध्ये ७०० शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ७०० शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं  वाटप करण्यात आलं. १७ अनुकंपाधारकांना देखील आज नियुक्तीपत्र देण्यात आली. युवकांनी या  रोजगाराचा अनुकुल वापर करून लोकसेवा करावी, असं आवाहन दादा भुसे यांनी या...

July 15, 2024 7:21 PM

नीट यूजी 2024: राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नीट यूजी अर्थात, पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत. त्या सर्वोच्च न्...

July 15, 2024 7:16 PM

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अमोल शिंदे याच्यासह ६ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, त...

July 15, 2024 7:11 PM

काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी देशातल्या ७० कोटी महिलांचा आवाज व्हायला हवं – अलका लांबा

काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी देशातल्या ७० कोटी महिलांचा आवाज व्हायला हवं, असं आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केलं आहे. अलका लांबा यांनी आज मुंबईत टिळक भवन इथं महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. मह...

July 15, 2024 6:57 PM

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात ३.३६ टक्क्यांवर

देशात अन्नधान्य, विशेषतः भाज्या आणि उत्पादित वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक बाजारपेठेतली महागाई वाढून जून महिन्यात ३ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यांवर गेली आहे. यात सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली. ही महागाई मे महिन्यात २ पूर्णांक ६१ शतांश टक्के इतकी होती.

July 15, 2024 6:55 PM

राज्यात आठवडाभर कमी आधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात हा आठवडाभर कमी आधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात राज्यातल्या सर्व विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तरळक ठिकाणी अतिशय जोरदार,  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला...