August 12, 2024 8:09 PM

श्रीनगरमध्ये तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीमचं उद्घाटन

जम्मू-काश्मीर  मधल्या श्रीनगर मध्ये  तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीम सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या यात्रेसह स्वाक्षरी मोहीमेचं उद्घाटन केलं. हजारो नागरिकांचा समावेश असलेल्या तिरंगा यात्रेत सिन्हा स्वतः सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या  हर घर तिरंगा ...

August 12, 2024 7:58 PM

प्रधानमंत्री- सूर्य घर- मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्र सरकारचे निर्देश जारी

प्रधानमंत्री-सूर्य घर-मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी  केंद्र सरकारनं निर्देश जारी केले आहेत. या योजनेंतर्गत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं ५ हजाराहून अधिक लोकसंख्येचं एकेक गाव आदर्श सौर ग्राम म्हणून विकसित केलं जाणार आहे. विशेष दर्जा प्राप्त असलेल्या...

August 12, 2024 7:52 PM

गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली

या वर्षीच्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर ३ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यापर्यंत खाली आला. गेल्या ५९ महिन्यांतला हा सर्वात कमी दर आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, भाजीपाला, फळं आणि मसाल्यांचे दर घसरल्यामुळं गेल्या मह...

August 12, 2024 7:41 PM

जूनमधे औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ

यंदा जून महिन्यात देशातल्या औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ झाल्याची माहिती, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. खणन क्षेत्रात १० पूर्णांक ३ दशांश टक्के, कारखानदारी क्षेत्रात २ पूर्णांक ६ दशांश टक्के, तर वीज क्षेत्रात ८ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ नोंदवली गेली आहे...

August 12, 2024 7:29 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समधे आज ५७ अंकांची घसरण

भारतीय शेअर बाजारातल्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये आज दिवसभर चढउतार पाहायला मिळाले. आज दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७ अंकांनी घसरून ७९ हजार ६४९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  २१ अंकांनी घसरून २४ हजार ३४७ अंकांवर बंद झाला. दरम्यान, आशिया खंडातल्...

August 12, 2024 6:58 PM

महायुतीचं जागावाटप सर्व घटकपक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप सर्व घटकपक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. त्यांच्या उपस्थितीत आज धुळे शहरात 'जन सन्मान यात्रा' झाली, त्यावेळी ते बोलत होते.  जागा वाटपाचा निर्णय योग्य पध्दतीनं होईल. काम करणाऱ्याच्या पाठीशी पक्ष उभा र...

August 12, 2024 6:42 PM

पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता

पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य वन्य जीव मंडळाच्या आज मुंबईत झलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी पेंच इथं पाणमांजर, नाशिकमधे गिधाड, तर गडचिरोलीत रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. राज्यात दुर्मिळ होत असलेल्या ...

August 12, 2024 6:41 PM

जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात

मित्र अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट  फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. यात राज्यात जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प तसंच कृष्णा भिमा खोऱ्यातली पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र...

August 12, 2024 6:36 PM

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातल्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत सर्वसाधारण गटात पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकावला असून आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांक बंगळुरूच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स ला मिळाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या...

August 12, 2024 4:01 PM

एटीएम चोरट्याना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारात एटीएम फोडून रोकड रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी दोन चोरटयांना रंगेहाथ पकडलं. एक चोर एटीएम मध्ये चोरी करतानाच सापडला, तर दुसऱ्याला पणदूर इथं पोलिसांनी पकडलं. एकूण चौघेजण या चोरीत सहभागी होते, पण दोघे पळून गेले. त्यांच्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आ...