August 14, 2024 5:06 PM

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईनचं आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं. व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून ह...

August 14, 2024 5:03 PM

निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडं सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डा ने देशव्यापी संप मागे घेतला आहे. सीबीआयच्या पथकानं ताली पोलीस स्थानकातून एफआयआरची प्रत ताब्यात घेतली असून चार डॉक्टरांची चौकशीही के...

August 14, 2024 3:56 PM

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास...

August 14, 2024 3:31 PM

देशाच्या फाळणीदरम्यान बलिदान दिलेल्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्मरण

७८वा स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील. त्यानंतर ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्...

August 14, 2024 1:41 PM

गृहमंत्री अमित शाह यांनी निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला

“हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्याच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानावर राष्ट्रध्वज फडकवला. कोट्यवधी भारतीयांमधली एकता,एकनिष्ठता आणि अभिमान याचं प्रतीक म्हणजेच तिरंगा, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीमध्ये म्हटलं आहे. घरावर तिरंगा फडकवताना देशाच्या स्...

August 14, 2024 1:30 PM

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्ज करण्यास सुरूवात

पुढच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू यांनी काल नवी दिल्लीत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली. २०२५ च्या हज यात्रेला जाणाऱ्या भारतीयांसाठी  सौदी अरेबियानं १ लाख ७५ लाख ...

August 14, 2024 1:26 PM

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांची पदावरून पायउतार होण्याची घोषणा

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांनी सप्टेंबर महिन्यात पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाला नव्या सुरुवातीची गरज असल्याचं सांगून त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पक्षानं सप्टेंबर महिन्यात नव्या नेत्याची निवड केल्यानंतर...

August 14, 2024 1:22 PM

‘TRAI’चे नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश

ट्राय अर्थात दूरसंचार नियंत्रण मंडळाने नोंदणीकृत नसलेल्या क्रमांकावरुन प्रचारासाठी करण्यात येणारे फोन थांबवण्याचे आदेश सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. अनावश्यक फोन टाळण्यासाठी दूरसंचार मंत्रालयानं हे निर्बंध लावले आहेत. नोंदणीकृत क्रमांकाशिवाय कोणत्याही क्रमांकावरून असे फोन येत असल्याचं आढ...

August 14, 2024 1:16 PM

अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला. यावर केंद्रीय अन्वेषण विभागानं उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

August 14, 2024 1:15 PM

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या ब...