August 16, 2024 7:06 PM

विनायक राऊतांच्या याचिकेवर नारायण राणेंनी उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचे निर्देश उच्च न्यायालयानं राणे यांना दिले आहेत.  राणे यांनी अवैध मार्गांनी ही निवडणूक जिंकली असल्याची...

August 16, 2024 8:50 PM

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप तयार करावं. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

August 16, 2024 7:29 PM

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरयाणामध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर,  २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील व...

August 16, 2024 3:31 PM

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं १५ सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार

पद्म पुरस्कार २०२५ साठीची नामांकनं येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. इच्छुक www.awards.gov.in या संकेत स्थळावर भेट देऊ शकतात.  पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.

August 16, 2024 3:11 PM

भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक ...

August 16, 2024 7:11 PM

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत मविआचा मेळावा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही मह...

August 16, 2024 2:50 PM

देशातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, छत्तीसगड, रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालमध्ये उद्यापर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच या आठवड्यात कोकण, गोवा, गुजर...

August 16, 2024 2:46 PM

गगनयान मोहिमेतलं पहिलं यान या वर्षाच्या शेवटी प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन

या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं....

September 25, 2024 6:03 PM

विधानसभा निवडणुक : वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलिंडर’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचित चे सर्व उमेदवार गॅस सिलिंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.

August 16, 2024 1:49 PM

नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होणार आहे. या वेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या दोन राज्यांच...