August 16, 2024 8:15 PM

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात सामंजस्य करार

प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा...

August 16, 2024 8:11 PM

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी आकाशवाणीवर ‘किसानों की बात’ हा कार्यक्रम

शेतकऱ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार आकाशवाणीवर किसानों की बात हा कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या  कार्यक्रमासारखा हा  ...

August 16, 2024 8:04 PM

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्याशी संवाद

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि पश्चिम आशियातल्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. सध्याचा तणाव कमी करणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सर्व बंदीवानांची तात्काळ सुटका करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संवाद आणि रा...

August 16, 2024 8:42 PM

बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण देण्याची महम्मद युनूस यांची प्रधानमंत्री मोदी यांना ग्वाही

बांगलादेशातल्या हिंदू आणि सर्व अल्पसंख्य़ांकांना संरक्षण दिलं जाईल, अशी ग्वाही बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांनी दिली आहे. त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि सद्य स्थितीबाबत चर्चा केली. आपापल्या राष्ट्रीय प्राधान्यांच्या अनुषंगान...

August 16, 2024 7:54 PM

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना ब...

August 16, 2024 7:41 PM

अमेरिकेतलं मंदीचं सावट दूर झाल्यानं देशातल्या शेअर बाजारात मोठी तेजी

गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठी तेजी नोंदवली. सेन्सेक्स १ हजार ३३१ अंकांची वाढ नोंदवून ८० हजार ४३७ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ३९७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५४१ अंकांवर बंद झाला. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार मंदीचं सावट दूर झाल्यानं ही तेजी दिस...

August 16, 2024 7:38 PM

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

येत्या दोन दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण, मध्य महारा...

August 16, 2024 8:26 PM

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४च्या उद्घाटनासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल यांची निवड

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल यांची निवड करण्यात आली आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ८४ भारतीय खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आह...

August 16, 2024 7:24 PM

शँपूच्या बाटल्यांमध्ये कोकेन…

गुप्तवार्ता महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज मुंबई विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेला अटक केली. तपासणी केल्यानंतर या महिलेकडून शँपूच्या बाटल्यांमध्ये भरलेलं जवळपास दोन किलो कोकेन जप्त केलं. या कोकेनची किंमत जवळपास २० कोटी असल्याचं सांगितलं जातंय. य...

August 16, 2024 7:19 PM

बांग्लादेशातील अत्याचारांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला राज्यात हिंसक वळण

बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात काही धार्मिक संघटनांनी बंद पुकारला होता. त्याला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं.   नाशिकमध्ये काही दुकानदारांनी बंदला विरोध केल्यानंतर दुकान बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली. यावेळी झालेल्या दगडफेकी...