August 23, 2024 8:08 PM

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त सैनिकी सराव ‘मित्र शक्ती’चा समारोप

भारत आणि श्रीलंका सैन्यदलांमधला दहावा संयुक्त  सैनिकी सराव  नुकताच पार पडला. श्रीलंकेतल्या मदुरू ओया इथल्या संरक्षण प्रशिक्षण शाळेत पार पडलेल्या या सरावसत्राला “मित्र शक्ती” असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंधारा तेन...

August 23, 2024 8:10 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी सीबीआयला मंजुरी

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी सीबीआयला आज मिळाली. केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयनं एक आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्याची सुनावणी येत्या २७ तारखेला दिल्लीच्या रोऊज अॅवेन्यू न्यायालयात होणार आहे.  दरम्यान आपल्या अटके...

August 23, 2024 7:49 PM

गुजरात सरकारकडून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मदत योजना जाहीर

गुजरातमधे यंदा जुलै महिन्यात जोरदार पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी गुजरात सरकारनं ३५० कोटी रुपयांची मदत योजना आज जाहीर केली. गुजरात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी राज्याचे कृषीमंत्री राघवजी पटेल यांनी विधानसभेत ही योजना जाहीर करताना सांगितलं की, नुकसानीच्या संरक्षणानुसार ९...

August 23, 2024 7:25 PM

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संग...

August 23, 2024 7:22 PM

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेने काही सामंजस्य करारही केले.  राष्ट्रीय कौशल्य प...

August 23, 2024 8:13 PM

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा

पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन आज साजरा झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान उतरलं होतं. या प्रीत्यर्थ देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या.  भारतीय अंतराळ संशोधन ...

August 24, 2024 10:15 AM

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायाल...

August 23, 2024 7:03 PM

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना...

August 23, 2024 6:56 PM

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट ...

August 23, 2024 7:56 PM

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी – केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदरं, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाचे विविध प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प आणि सामंजस्य करार मुं...