August 25, 2024 2:12 PM

लखपती दीदी मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जळगावात आगमन

लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि ...

August 25, 2024 10:45 AM

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सित...

August 25, 2024 10:40 AM

नेपाळ बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह जळगावात दाखल

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुल...

August 24, 2024 8:10 PM

विधानसभा निवडणुकीत मनसे २५० जागा  लढवणार

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २५० जागा  लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. नागपुरातील रवि भवन इथं  आज, ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जनता आपल्यासोबत असून मनसेला निवडणुकीत चांगले यश मिळेल असा दावा ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठीची आपली धोरणं त्या...

August 24, 2024 8:07 PM

भारताच्या किशोर कुमारची तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

भारताच्या किशोर कुमारनं आज तराफा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानं येत्या २०२६ आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा प्रथमच तराफा खेळासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. जपानच्या ऐची-नागोया इथं ही स्पर्धा होणार आहे. किशोर कुमारनं आशियाई सर्फिंग अजिंक्यपद २०२४ स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उपांत्य फेरीत अत्यंत चांग...

August 24, 2024 8:03 PM

मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतून मुक्त करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

येत्या मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतुन संपूर्ण मुक्त केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज छत्तीसगढ़ची राजधानी रायपुर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. माओवाद्यांविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण करायला इच्छुक असलेल...

August 24, 2024 7:58 PM

केंद्रीय मंत्रीमंडळाची UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. NPS अर्थात नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी या...

August 24, 2024 7:55 PM

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार

कोलकात्यात राधागोविंद कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष तपास पथकानं तपासाची कागदपत्र केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सुपूर्द केली असून सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा त्यात समावेश आहे. सिएलदा न्यायालयानं दिली आहे. आतापर्य...

August 24, 2024 7:37 PM

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ...

August 24, 2024 7:33 PM

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत ...