August 25, 2024 3:35 PM

दिंडी चालकांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार

आषाढीवारी निमित्त पंढरपूरात येणाऱ्या पायी दिंड्यांना प्रति दिंडी २० हजाराचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार  दिंडी चालकांच्या खात्यात प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं मान्यता दिली आहे. प्रत्येक दिंड...

August 25, 2024 3:28 PM

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त...

August 25, 2024 3:24 PM

देशाला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री

देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या वाटचालीत महिलांचा मोठा वाटा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव मध्ये आज झालेल्या लखपती दिदी संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातल्या ११ लाख नव्या लखपती दीदींना, प्रतिकात्मक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन...

August 25, 2024 3:23 PM

महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी संवाद साधला. महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्राति...

August 25, 2024 1:53 PM

महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.    राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम आणि मेघ...

August 25, 2024 1:37 PM

भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं

चीनमध्ये चेंगडूू इथं सुरू असलेल्या आशिया १७ आणि १५ खालील कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तन्वीने अंतिम लढतीत व्हिएतनामच्या गुयेन थि थू ह्युगेनचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.   १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत, ...

August 25, 2024 12:57 PM

विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज – प्रधानमंत्री

  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियां...

August 25, 2024 12:37 PM

पुण्यात मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी

मंकीपॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसांत करण्यात आली. यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून...

August 25, 2024 7:30 PM

कोलकातातल्या आरजी कर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु

कोलकाता इथल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी १५ ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. सीबीआयचं पथक आरजी करचे माजी प्राचार्य डाॅ संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. तसंच सीबीआय महाविद्यालयातचे नवे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची चौक...

August 25, 2024 12:27 PM

टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना अटक

टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये पॅरीस इथं काल अटक करण्यात आली. टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जा...