August 27, 2024 9:28 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात युक्रेन आणि बांगलादेशातल्या परिस्थितीवर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यो बायडन यांनी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल प्रधानमंत्री मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी ...

August 27, 2024 9:15 AM

२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन – भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन

२०२६पर्यंत एकाच वेळी अवकाशात गगनयान आणि समुद्रात समुद्रयान सोडण्याच्या दृष्टीने नियोजन आहे, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी काल पुण्यात दिली. भारतीय समशीतोष्ण हवामान संस्थेत आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामानाचा आणखी अचूक अ...

August 27, 2024 9:09 AM

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यासाठी, राज्य शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ...

August 27, 2024 10:29 AM

जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याख...

August 27, 2024 9:02 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच...

August 27, 2024 8:50 AM

लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज – आदित्य ठाकरे

लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्...

August 26, 2024 8:56 PM

मणीपूरमध्ये पेट्रोल पंपांवर सुरक्षा दलांच्या जवानांची नियुक्ती करायचा निर्णय

मणीपूरमध्ये पेट्रोल पंपांवर  सुरक्षा दलांच्या जवानांची नियुक्ती करायचा निर्णय मणीपूर राज्य सरकारने घेतला आहे. आज इंफाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मणीपूरचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्र्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलत काही समाजकंटक पेट्रोलपंपावरुन ...

August 26, 2024 8:54 PM

CPGRAMS नं केली तक्रारींची दखल घेण्यासाठी नियमावली तयार

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृतीवेतन मंत्रालयाने सार्वजनिक तक्रारींची ठराविक कालावधीत दखल घेण्यासाठी नियमावली तयार केली आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी  www.pgportal.gov  या पोर्टलवर नोंदवता येतील. या तक्रारींची दखल घेण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना नोडल अधिकारी नियुक्त करावे लागतील....

August 26, 2024 8:47 PM

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचा बांगलादेशाकडून पराभव

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आज भारतीय संघाला बांगलादेशाकडून पराभव पत्करावा लागला. नेपाळमधे काठमांडू इथं या स्पर्धेचा अंतिम सामना झाला.  हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटका...

August 26, 2024 8:40 PM

जम्मू-कश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाची सोळा उमेदवारांची यादी जाहीर

जम्मू काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने आज सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. ९० जागांसाठी होणाऱ्या या  निवडणुकीकरता भाजपानं याआधी ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती मात्र ती नंतर मागं घेतली. या निवडणुका येत्या १८ सप्टेंबरपासून तीन टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी ४ ऑक्टोबरला होईल.