August 27, 2024 1:51 PM

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सहभागी होणार

B P R D अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या  स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत सहभागी होतील. यानिमित्ताने आयोजित डॉ. आनंद स्वरुप गुप्ता स्मृती व्याख्यानमालेत ‘नवीन फौजदारी कायदेः नागरीककेंद्रित सुधारणा’ या विषयावर शाह व्याख्यान देतील. यावेळी ते विशि...

August 27, 2024 12:27 PM

शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदलाचं एक पथक रवाना

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरला पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. र...

August 27, 2024 1:54 PM

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र झारखंडच्या संधाल प्रांतातल्या रामगढ जिल्ह्यात होतं. या भूंकपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

August 27, 2024 12:18 PM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमित नागल पहिल्याच फेरीत बाहेर

 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत भारताचा महत्त्वाचा खेळाडू सुमित नागलला टेलॉन ग्रिकस्पोरनं पहिल्याच सामन्यात पराभूत केलं आहे. टेलॉननं त्याला १-६,३-६,६-७ असा पराभव केला. भारताच्या आशा आता रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि एन.श्रीराम बालाजी याच्यावर टिकून आहेत.

August 27, 2024 12:13 PM

A1 आणि A2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनांच्या पाकिटांवरील दावे तात्काळ काढून टाकण्यासंबंधीचा आदेश FSSAI कडून मागे

ए-वन आणि ए-2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनांच्या पाकिटांवरील सर्व दावे तात्काळ काढून टाकण्यासंबंधी नुकताच दिलेला आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं मागे घेतला आहे. याबाबत संबंधितांशी आणखी विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी हा आदेश मागे घेण्यात आला असल्याचं एफएसएसएआयनं म्हटलं आहे.

August 27, 2024 10:23 AM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये सुरुवात

यावर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. आज सकाळी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलचा सामना डच खेळाडू टॅलन ग्रीक्सपूरशी होईल. एका वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरी स्पर्धेत भाग घेणारा नागल हा 2019 नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दोन वेळचा ग...

August 27, 2024 1:37 PM

गुजरातमध्ये गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे ५०० रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे १७ हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे...

August 27, 2024 10:25 AM

जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन येत्या 30 तारखेला भाजपामध्ये प्रवेश करणार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन या महिन्याच्या 30 तारखेला रांची इथं भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी समाज माध्यमावर एका संदेशातून केली आहे. ते भाजपाचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी देखील...

August 27, 2024 9:54 AM

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं आपले नेते गुलाम मोहम्मद मीर यांना डोरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर शेख रियाझ दोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोडा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रदीपकुमार भगत हे काँग्रेसचे उमे...

August 27, 2024 12:33 PM

नवी दिल्लीत आज ९ व्या भारत-ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन

भारत आणि ब्राझील यांच्यात आज होणाऱ्या ९व्या संयुक्त आयोग बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो वीईरा संयुक्तपणे भुषवतील. मौरो वीईरा हे चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझीलमधल्या राजनैतिक संबंधांना चालना मिळेल, अस...