August 28, 2024 6:38 PM

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक – राष्ट्रपती

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक असून आता जनता हे सहन करणार नाही असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारचे गुन्हे सर्रास घडतात हे अधिक भयावह असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पूर्वप्राथमिक...

August 28, 2024 6:57 PM

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई- लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मातृभाषेत स्थानिक विषयांशी संबंधित प्रसारणाला प्रोत्साहन देण्यासाठी हानिर्णय घेतल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या निर्णयामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरा...

August 28, 2024 6:14 PM

राज्यात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं भरली

राज्यात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं भरली आहेत.  नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे कोयना धरणातला पाणीसाठी १०२ पूर्णांक ४३ दशांश टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे आज धरणाचे सह...

August 28, 2024 6:55 PM

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘म्हाडा शुभंकर चिन्हाचं’ अनावरण

म्हाडातर्फे मुंबईतल्या २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतल्या ३७० सदनिकांच्या विक्री किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली. सुलभ जनसंवादाच्या उद्देशाने म्हाडाने तयार केलेल्या शुभंकर चिन्हाचं अनावरण आज सावे यांच्या हस्ते झालं त्यावे...

August 28, 2024 4:50 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट क...

August 28, 2024 6:56 PM

१२ नव्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट सिटींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमा अंतर्गत बारा नव्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट सिटींना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांन नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. यासाठी अंदाजे २८ हजार ६०२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात य...

August 28, 2024 3:41 PM

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात अनेक लोक सहभाग झाले होते. शहरातल्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. बांगलादेशातले अत्याचार थांबावेत यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी...

August 28, 2024 3:34 PM

प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण

प्रधानमंत्री जनधन योजनेला आज ‘एक दशक’ पूर्ण झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी, ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.  या योजनेच्या दशकपूर्ती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्याचं अभिनंदन केलं असून ही योजना  यशस्व...

August 28, 2024 3:29 PM

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेध मोर्चादरम्यान तणाव

मालवण राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज तिथं गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला  असे दोघे जखमी झाले.  आज महाविकास आघाडीनं मालवण बंदची हाक दिली होती, त्याला मालवण मध्ये श...

August 28, 2024 3:23 PM

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

गुजरातमधे वडोदरा इथं मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या  रद्द करण्यात आल्या आहेत. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस, लोकशक्ती एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राणकपूर एक्सप्रेस, भगवत की कोठी एक्सप्रेस आणि जयपूर एक्सप्रेस या र...