August 8, 2024 7:20 PM

रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळचे डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची निवड

यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत.त्यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रूपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे.   केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्ष...

August 8, 2024 7:16 PM

यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.

June 25, 2024 3:58 PM

यवतमाळमध्ये दिव्यांग्यांच्या पंढरपूर वारीचं आयोजन

राज्यातली पहिलीच पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूर वारी यवतमाळच्या दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी आज निघाले. संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका घेऊन आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा हा प्रवास पायी करून दिव्यांग वारी पंढरपूरला पोहचेल.