July 20, 2024 9:14 AM

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.

July 6, 2024 9:49 AM

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

  महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी निर्धारित 20 षटकांत 4 बाद 177 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 189 धावा केल्या.   दक्षिण आफ्रिकेसाठी तझमिन ब्रिट्सने 81 धावांचं योगदान दिलं तर भारताच्या स्मृती मन्धना हिनं 46 धावा केल्या. तझमिन ब्रिट्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दक्...