August 15, 2024 1:36 PM

जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स आजारावरुन घोषित केली आणीबाणी

जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांत दुसऱ्यांदा एमपॉक्स या आजारावरुन आणीबाणी घोषित केली आहे. मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशात या विषाणूजन्य संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी ही घोषणा केली.   बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. Mpox संसर्गजन्य असून क्वचित प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरु शकतो. याची लक्षणं फ्लूसारखी असतात आणि शरीरावर व्रण होतात. WHO नं आकस्मिक निधी म्हणून १५ लाख अमेरिकन डॉलर्स दिले आहेत.

June 26, 2024 10:25 AM

मद्य सेवनाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं दक्षिण-पूर्व आशियाई देशांना आवाहन

कोणत्याही स्वरूपातील, दारू आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं जाहीर करावं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिणपूर्व आशियातल्या सदस्य देशांना केलं आहे. तसंच तंबाखू उत्पादनांचा अवैध व्यापार थांबवण्यासाठी निर्णायक कृती करणे आवश्यक आहे यावर जोर दिला आहे. बँकॉकमध्ये आयोजित प्रादेशिक कार्यशाळेत काल संघटनेच्या प्रादेशिक संचालिका सायमा वाजेद यांनी तंबाखूचा अवैध व्यापार आणि मद्य सेवनाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचं आवाहन केले.तंबाखू उत्पादनांमधील बेकायदेशीर व्यापार दूर करण्यासाठी सर्व सदस्य राष्टांन...