September 11, 2024 2:29 PM

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे....

July 1, 2024 1:28 PM

राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. अजिंठा लेणीतल्या सहस्त्रकुंड धबधब्यासह लहान - मोठे नाले खळखळून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही आठवडा भराच्या विश्रांती नंतर काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना नव संजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतल्या काही ...