September 21, 2024 8:06 PM

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला संप कोलकात्यातील आपात्कालीन सेवेतल्या डॉक्टरांकडून मागे

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र या डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा सुरू केलेली नाही. त्यांचा लढा न्यायालयामार्फत सुरूच राहिल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी दहा कलमी नि...

September 20, 2024 6:32 PM

पश्चिम बंगाल : मागण्या मान्य झाल्यामुळे डॉक्टरांचा संप मागे

पश्चिम बंगालमध्ये संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवांमध्ये उद्यापासून काम सुरु करण्याची घोषणा केली आहे. सरकारनं संपावर असणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातली पूर परिस्थिती लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची घोषणा डॉक्टरांच्या संघटनेनं केली आहे.

September 13, 2024 3:04 PM

पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ईडीचे छापे

अन्न पुरवठा आणि वितरण भ्रष्टाचार प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली  संचालनालयानं आज पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि कोलकाता यासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. विविध गोदामं, रास्त भाव दुकाने आणि रेशन विक्रेत्यांच्या घरांची तपासणी सुरू आहे.

September 2, 2024 9:26 AM

पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू

  पश्चिम बंगालमध्ये आर. जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या निवासी डॉक्टरवरील नृशंस अत्याचाराविरोधात आणि न्यायासाठी निदर्शनं अजूनही सुरू आहेत. कालही राज्यात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या.   सामान्य नागरिकांनी काढलेल्या रॅलीत कलाकार, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले. तर नागरी समाजाचे प्रतिनिधी रात्रभर धरमतला इथं धरणं आंदोलन करत आहेत. रामकृष्ण मिशनचे माजी विद्यार्थीही काल रस्त्यावर उतरले. दरम्यान, कार रुग्णालयाच्या कनिष्ठ डॉक्टर्सनी कोलकातातल्या आ...

August 15, 2024 8:26 PM

कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात काही व्यक्तींनी काल रात्री तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून २६ जणांची ओळख पटली आहे. महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि खून प्रकरणी सीबीआयचं पथक आज या ठिकाणी पोहोचलं. दुसरं पथक महिलेच्या घरी गेलं आहे.

June 16, 2024 12:51 PM

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपची समिती स्थापन

देशाची लोकसभा निवडणुक पार पडल्यानंरत पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपनं एक समिती स्थापन केली आहे. खासदार बिप्लब कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार या भाजपा नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या राजकीय हिंसाचारांच्या घटनांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अहवाल सादर करणार आहेत.