June 19, 2024 7:20 PM
राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती
नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन-चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गेल्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश ढगाळ राहील. परिसर...