September 25, 2024 3:42 PM

वाशीम जिल्ह्यात स्वछता अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

स्वछता अभियान २०२४ अंतर्गत वाशीम जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळाने अयोध्येत श्री रामजन्मभूमी इथे शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात ५१ महिलांनी सहभाग घेतला. तसंच, जिल्ह्यातल्या कामरगाव इथे आज क्लीन इंडिया मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला. हा कार्यक्रम वाशीम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आला होता.

August 15, 2024 6:46 PM

वाशिम – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमधे सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला. जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

August 2, 2024 5:52 PM

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरावं अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.