September 21, 2024 3:34 PM

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची-पालकांची आर्थिक लूट करण्याचा महायुतीचा डाव – विजय वडेट्टीवार

राज्यातल्या खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून पाच पट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारनं तात्काळ स्थगित करावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी-पालकांवर १५ लाख रुपयांचा अतिरिक्त शुल्काचा भार पडला आहे. संस्थांना होणाऱ्या लाभाची ही एकूण रक्कम सुमारे १६५ कोटी रुपये एवढी ...

September 16, 2024 7:03 PM

शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हिंसेला चिथावणी देणारं असल्यानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून, मानसिक संतुलन देखील ढळलं आहे, त्यामुळेच लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याबाबत अशी भाषा ते वापरत आहेत. पण राज्यातली जनता हिंसक वृत्ती बाळगणाऱ्यांना योग्यवेळी धडा शिकवेल, असं वडेट्टीवार यांनी ...

July 25, 2024 7:19 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.   अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर, सांगली या शहरांना पुराचा धोका होऊ नये, यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आ...

July 18, 2024 3:19 PM

विशाळगडावरी घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं – विजय वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं, तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात चौकशीच्या मागणीचं पत्र सरकारला दिलं आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

July 11, 2024 7:07 PM

सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती  देऊन  त्यांचं  थकित वीजबिल माफ करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली  आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.   निर्यात बंदी, शेतमालाला भाव नसणं, कर्जाचा वाढता बोजा, पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खतं, बियाणं, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, तसंच ...