September 12, 2024 10:26 AM

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर गेली आहे. हनोईमधून काल हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. यागी हे आशियातलं या वर्षीचं सर्वातं शक्तिशाली चक्रीवादळ असून, त्यामुळे व्हिएतनाममध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हनोईतली लाल नदी वीस वर्षांमधल्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे, त्यामुळे तिच्या काठांवर्चया नागरिकांनं जनजीवन विस्कळित झालं आहे.

August 16, 2024 8:46 PM

सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा

परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाचं सहकार्य आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी आदी विषयांवर या चर्चेचा प्रामुख्यानं भर होता.

July 31, 2024 11:23 AM

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम चिन्ह तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळात अनेक मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रण धीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. ...