September 22, 2024 9:48 AM

वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आं...

September 8, 2024 2:19 PM

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

जम्मू काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागं घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराला वेग येत आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. पक्षाचे स्टार प्रचारक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज रामबन आणि बनिहालमधे प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जम्मूच्या पालोरा भागात सभा घेतली. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनीही जम्मू काश्मीरला भेट दिली. या आठवड्यात प्रधआनमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष...

August 31, 2024 6:57 PM

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची भर पडली आहे. यानंतरही विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी यादीत नाव नसलेल्या मात्र पात्...

July 27, 2024 7:03 PM

संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जे विचारानं आमच्यासमवेत आहेत, त्यांना पक्षात परत घेण्यासंबंधी पक्...