August 31, 2024 2:49 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते देहरादूनमधल्या CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इथं शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. तसंच ते राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि एम्स संस्थेलाही भेट देणार आहेत.

August 15, 2024 3:37 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिन हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा उत्सव असून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे, असं धनखड आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सर्व नागरिकांना २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहनही धनखड यांनी या संदेशातून केलं.   मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, उच्च न्यायालय अशा ऐतिहास...