July 26, 2024 1:15 PM

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं अमेरिकेचं इस्राइलला आवाहन

गाझा पट्टीत हमाससोबत लवकरात लवकर शस्त्रसंधी करण्याचं आवाहन अमेरिकेनं इस्राइलला केलं आहे. इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्यू यांनी आज वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यावेळी हॅरिस यांनी ही विनंती नेत्यानू यांना केली. शस्त्रसंधीमधले अडथळे लवकरात लवकर दूर करुन बंदी ठेवलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्याचं आवाहन बायडेन यांनी केलं.

July 24, 2024 2:57 PM

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या उपसंचालकपदावर कार्यरत होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख किंबर्ली चीटल यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रोवे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे.

June 26, 2024 2:44 PM

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीनं आयरीश जोडीचा केला पराभव

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात कृष्ण प्रसाद गरगा आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीनं स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्डस या आयरीश जोडीचा पराभव केला.राऊंड ३२ च्या या सामन्यात भारतीय जोडीनं २१-१४, २१-१२ अशा सरळ गेममधे प्रतिस्पर्धी जोडीला नमवलं.   भारताच्या कार्तिकेय गुलशन कुमारचं आव्हान मात्र काल रात्री संपुष्टात आलं. तो चायनीज ताईपेईच्या जे लिआओकडून १९-२०, १३-२१ असा पराभूत झाला. त्यामुळे तो उप उपांत्य पूर्व फेरीत पोहोचू शकला नाही. पॅरीस ऑलिम्पिक्सला जेमतेम महिना राहिल...

June 25, 2024 2:58 PM

बिगर-नाटो सहयोगी म्हणून अमेरिकेने केनियाची नियुक्ती केली

अमेरिकेने आपला एमएनएनए, म्हणजेच प्रमुख बिगर-नाटो सहयोगी म्हणून केनियाची नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार एमएनएनए हा दर्जा, परदेशी भागीदार देशांना संरक्षण, व्यापार आणि सुरक्षा विषयक सहकार्याच्या क्षेत्रात काही लाभ मिळवून देतो.   केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या गेल्या महिन्यातल्या अमेरिका भेटी दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केनियाला आपला प्रमुख बिगर -नाटो सहयोगी म्हणून नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं.

June 19, 2024 2:53 PM

अमेरिकन व्यक्तीशी विवाह केलेल्या परंतु कायदेशीररित्या देशात राहण्याचा अधिकार नसलेल्यांसाठी नवी तरतूद

I अनेक स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासंदर्भात एक नवीन तरतूद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या तरतुदीमुळे सुमारे पाच लाख नागरिकांना मायदेशी परत पाठवलं जाणार नाही.   बायडेन यांनी मांडलेल्या प्रस्तावात अमेरिकेत किमान दहा वर्षे वास्तव्य केलेल्या आणि अमेरिकन व्यक्तीशी लग्न करुन अपत्यांना जन्म देणाऱ्या व्यक्तीला कायमस्वरुपी नागरिकत्व देण्याची शिफारस केली आहे.   बायडेन यांचा हा प्रस्ताव त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल...