September 22, 2024 8:23 PM

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

August 2, 2024 3:32 PM

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिका आणि इस्रायल यांच्यात चर्चा

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. इस्रायलवर हल्ले करण्याची धमकी इराणने दिली होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. इराण किंवा हमासच्या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्यासाठी अमेरिका कटीबद्ध असल्याचं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.  

July 22, 2024 1:41 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून डेमॉक्रॅटिक पार्टी आणि देशाच्या हितासाठी अध्यक्षपदाच्या उर्वरीत काळात आपलं कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष देणार असल्याचं बायडेन म्हणाले. या आठवड्याच्या शेवटी आपण दे...