August 27, 2024 10:23 AM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये सुरुवात

यावर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. आज सकाळी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलचा सामना डच खेळाडू टॅलन ग्रीक्सपूरशी होईल. एका वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरी स्पर्धेत भाग घेणारा नागल हा 2019 नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दोन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना पुरुष दुहेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबॉलोस यांच्या नंतरचं दुसरं मानांकन मिळालं...

August 23, 2024 1:34 PM

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमीत नागलची लढत नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या सुमीत नागलची लढत येत्या सोमवारी नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूर याच्याशी होणार आहे. यूएस ओपनच्या जुलै महिन्यात झालेल्या मुख्य ड्रॉ मध्ये सुमीतनं स्थान मिळवलं. जागतिक क्रमवारीत सुमीत ७२ व्या क्रमांकावर आहे.   दरम्यान, यूएस ओपनमध्ये २४ वेळा ग्रँडस्लॅम विजेता आणि पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावलेला नोव्हाक जोकोविच याची लढत राडू अल्बोट विरुद्ध होणार आहे. तर अव्वल मानांकित जॅनिक सिनर याचा सामना मॅकेन्झी मॅकडोनाल्ड याच्याशी होणार आहे. पहिल्या ...