September 22, 2024 8:23 PM

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

September 18, 2024 1:00 PM

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत बैठक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या असून यामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. या बैठकांमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व सह सचिव नागराज नायडू यांनी तर अमेरि...

September 17, 2024 8:19 PM

प्रयेत्या २१ ते २३ तारखेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.

September 13, 2024 9:31 AM

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करायला अमेरिकेचा पाठिंबा आहे. भारत, जपान आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाव म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. मात्र काही देशांचा या नवीन संशोधन प्रस्तावाला विरोध आहे...

September 12, 2024 5:10 PM

भारताला हाय अल्टीट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय

 हाय अल्टिट्युड अँटी सबमरिन वॉरफेअर हे पाणबुडीरोधक युद्ध  तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे. ५ कोटी २८ लाख रूपये  किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएच ६० आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल. या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्वीपक्षीय संबंधांना नवे आयाम मिळणार असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे.

August 24, 2024 4:10 PM

पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेची मंजुरी

बहुउपयोगी एम एच ६० सिहॉक हेलिकॉप्टर श्रेणीतल्या ५ कोटी २८ लाख अमेरीकी डॉलर एवढ्या किंमतीची पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव अँथनी ब्लिंकन यांनी याबाबत पुढाकार घेतला. अमेरिकी काँग्रेसच्या परवानगीने संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेनं याबाबतच्या मंजुरी प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे संरक्षण भागीदारी प्रक्रियेतला महत्वपूर्ण सहकारी असलेल्या भारतासोबत द्विपक्षीय धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासह वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरण...

August 23, 2024 12:56 PM

अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरीत्या स्वीकारला

अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची निवणूक लढवण्याचा प्रस्ताव औपचारिकरीत्या स्वीकारला आहे. शिकागो इथं डेमोक्रॅटिक पक्षाच्या मेळाव्यात काल त्यांनी ही घोषणा केली.  अमेरिकनांना एकत्र आणणं आणि अमेरिकेच्या भविष्यासाठी लढणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव जाहीर केलं होतं. हॅरिस निवडणुकीत यशस्वी झाल्यास त्या अमेरिकेच्या पहिल...

August 14, 2024 9:34 AM

भारत-अमेरिकेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढण्यासाठी सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अमेरिकेतल्या सरकारच्या लघु उद्योग प्रशासन विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत हे सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं कौशल्याचं आदानप्रदान करण्याबाबतच्या मुद्द्याचाही या करारात समावेश आहे. महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी तसंच दोन्ही देशातल्या महिला संचलित लघु उद्योगांमधल्या व्यापारी भागीदारीला चालना देण्यासाठी या करारानुसार संयुक्त उपक्रम ...

July 27, 2024 2:47 PM

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल रात्री आपली उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली. यासाठी आवश्यक असणारे अर्ज त्यांनी काल जमा केले. प्रत्येक मत मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, असं सांगून निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे व्यक्त केला.   विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस केली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या...

July 27, 2024 1:25 PM

बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार

भारतातून अमेरिकेत चोरुन नेलेल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, प्राचीन मुर्ती, पूरातन आणि पारंपरिक वस्तूं संदर्भात भारत आणि अमेरिकेत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देशातल्या अवैध व्यापार, निर्यात आयात आणि पूरातत्व वस्तूंच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. भारताचा अमेरिकेबरोबर करण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे.  आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी ही माहिती दिली. हा करार ऐतिहासिक असल्याचं ते यावेळी म्ह...