August 31, 2024 2:13 PM

भारतातील UPI ने जगातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला मागे टाकले

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून या वर्षीच्या एप्रिल ते जुलै मध्ये एक्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये वार्षिक ३७ टक्के वाढ होत आहे. ग्लोबल पेमेन्ट हब पेसिक्युअरने दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला ३ हजार ७२९ व्यवहार होतात.  

August 2, 2024 1:52 PM

जुलै महिन्यात देशभरात युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांनी गाठला २० लाख ६४ हजार कोटी रुपयांचा टप्पा

यंदाच्या जुलै महिन्यात देशभरात युपीआय आधारित व्यवहारांमध्ये वाढ होऊन ते २० लाख ६४ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काल जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. युपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये दर वर्षी ३५ टक्के वाढ होत असल्याचं यात म्हटलं आहे. जुलैमध्ये एकूण युपीआय व्यवहारांची संख्या जवळजवळ ४ टक्के वाढून १४ अब्ज ४४ कोटींवर पोहोचली, तर दैनंदिनव्यवहारांचं सरासरी प्रमाण ४६६ दशलक्ष इतकं होतं. युपीआय परदेशातल्या काही देशांमध्ये सुरु झाल्यामुळे, तसंच रूपे क्र...