September 19, 2024 9:36 AM

एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या

एक देश एक निवडणूक या संकल्पनेची वास्तविकता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं विविध राजकीय पक्ष आणि तज्ञांसह संबंधितांशी देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केल्याचंही वैष्णव या...

September 2, 2024 6:54 PM

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. महाराष्ट्रतले २ आणि मध्यप्रदेशातले ४ जिल्हे यातून जोडले जाणार आहे. या मार्गावर ३० रेल्वे स्थानकं असतील, यामुळं १ हजार गावांना आणि ३० लाख नागरिकांना याचा ...

September 2, 2024 4:06 PM

केंद्रीय मंत्रीमंडळाची डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज ही बैठक झाली. यासाठी २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यामुळं नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

August 24, 2024 7:58 PM

केंद्रीय मंत्रीमंडळाची UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. NPS अर्थात नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले तर ही संख्या ९० लाखांनी वाढतील, अशी माहिती माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत दिली. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या ...

June 19, 2024 8:53 PM

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं. यामुळं शेतकऱ्यांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं ते म्हणाले.   वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी...